मुंबईसह राज्यात थंडीची लाट!

मुंबईसह राज्यात थंडीची लाट!

  • Share this:

æ¯ÖÖê»ÖÖêêy

22 जानेवारी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे मुंबई आणि महाराष्ट्रात चांगलंच गारठलं असून किमान तापमान 5 अंश ते 11 अंशा सेल्सियसपर्यंत खाली घसरला आहे. मुंबईत जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. रविवारपासून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रात्रीच्या तापमानात मोठी घट होत असून गेल्या अनेक वर्षात मुंबईत पहिल्यांदाच इथकी थंडी जाणवतीये.

मुंबईतही ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून ऊब घेतांनाचे चित्र पाहायला मिळत आहे. कुर्ल्यातील रेल्वे कॉलनीत रात्रीच्या वेळी शेकोटि पेटवून अनेक जण थंडीचा आनंद लूटत आहेत. विशेषत: नाशिक आणि निफाडमध्ये थंडीचा पारा कमालीचा खालावला आहे. गेल्या 24 तासांतलं राज्यातल्या प्रमुख शहरांमधलं तापमान राज्यात सर्वात कमी तापमान निफाड 5 अंशावर गेलं आहे.

उत्तरेत थंडीचा प्रभाव वाढत असल्याने पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थानात थंडीचा कहर सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून इथे दाट धुक्याची चादर पसरली आहे. दिल्लीत आज सकाळी तापमानाची 4 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिक शेकोटीजवळ ऊब घेताना दिसून येत आहेत. दरम्यान दिल्लीत धुक्यामुळे 10 देशांतर्गंत आणि 1 आंतरराष्ट्रीय विमानसेवावर परिणाम झाला आहे. तर जवळपास दिल्लीतून निघणाऱ्या 25 ट्रेन उशीराने धावत आहे. तसंच रस्ता वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम झाला आहे.

राज्य गारठलं

मुंबई - 19.4 अंश सेल्सिअस

सांताक्रुझ - 15.2 अंश सेल्सिअस

रत्नागिरी - 14.6 अंश सेल्सिअस

पुणे - 8.0 अंश सेल्सिअस

अहमदनगर - 11.8 अंश सेल्सिअस

महाबळेश्वर - 9.8 अंश सेल्सिअस

मालेगाव - 9.4 अंश सेल्सिअस

नाशिक - 5.5 अंश सेल्सिअस

सातारा - 15.2 अंश सेल्सिअस

अलिबाग -16.6 अंश सेल्सिअस

रत्नागिरी - 14.6 अंश सेल्सिअस

डहाणू -13.7 अंश सेल्सिअस

पुणे - 8.0 अंश सेल्सिअस

सातारा - 12.7 अंश सेल्सिअस

सोलापूर - 15.2 अंश सेल्सिअस

उस्मानाबाद - 10.3 अंश सेल्सिअस

औरंगाबाद - 11.2 अंश सेल्सिअस

परभणी - 10.01 अंश सेल्सिअस

नांदेड - 9.0 अंश सेल्सिअस

अकोला -10.1 अंश सेल्सिअस

अमरावती - 10.0 अंश सेल्सिअस

यवतमाळ - 10.0 अंश सेल्सिअस

वर्धा - 9.0 अंश सेल्सिअस

गोंदिया - 8.5 अंश सेल्सिअस

Follow @ibnlokmattv

First published: January 22, 2016, 8:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading