ऑस्ट्रेलियाचा विजयी 'चौकार', भारताचा पुन्हा लाजिरवाणा पराभव

ऑस्ट्रेलियाचा विजयी 'चौकार', भारताचा पुन्हा लाजिरवाणा पराभव

  • Share this:

ind_Vs_aus20 जानेवारी : ऑस्ट्रेलियाने विजयाचा 'चौकार' लगावत पुन्हा एकदा भारताला पराभूत केलंय. विराट कोहली आणि शिखर धवनने शतकी खेळी करूनही भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. हाता तोंडाशी आलेली मॅचही भारताला गमाववी लागली. ऑस्ट्रेलियाने भारताचा 25 रन्सने पराभव केलाय.

कॅनबरा वनडेत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्टे्रलियाने 8 विकेटवर 348 रन्सचा डोंगर उभा केला. 349 रन्सचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाचा चांगलाच कस लागला. विराट कोहली आणि शिखर धवनने धडाकेबाज शतक  झळकावले. शिखर धवनने शानदार इनिंग पेश करत 126 रन्स ठोकले. त्यापाठोपाठ विराटनेही 36 व्या ओव्हरमध्ये 84 बॉल्समध्ये शतक पूर्ण केले. पण त्यानंतर 126 रन्स करून शिखर धवन आऊट झाला. टीमची कमान सांभळण्यासाठी आलेला महेंद्रसिंग धोणी भोपळाही फोडू शकला नाही. धोणी आऊट झाल्यानंतर एक एक करत बॅटसमॅन पव्हेलियनमध्ये परतले. ऑस्टे्रलियन बॉलर्सच्या माऱ्यापुढे टीम इंडिया 323 रन्सवर गुंडाळली गेली. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने सर्वाधिक 5 विकेट घेतले. पाच वनडेची सिरीज आधीच ऑस्ट्रेलियन टीमने खिश्यात घातलीये. आज चौथी वन डे जिंकत आता टीम इंडियाला व्हाईटव्हॉश देण्याच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलंय.

Follow @ibnlokmattv

First published: January 20, 2016, 7:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading