अरविंद केजरीवाल यांना कुर्ला कोर्टाचा दिलासा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 20, 2016 01:09 PM IST

Arvind Kejriwal meets people

मुंबई - 20 जानेवारी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कुर्ला कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. मानखुर्दमध्ये विनापरवानगी मोर्चा काढल्या प्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टाने केजरीवाल यांना दिलासा दिला आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान केजरीवाल यांनी कुर्ल्यात सभा घेतली होती. ज्येष्ठ समाजसेवीका मेधा पाटकर हे निवडणुकीच्या रिंगनात उतरले होते. त्यांच्याच प्रचारासाठी ते मुंबईत आले होते. मात्र, कोणतेही परवानगी न घेता भाषण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती. त्याचसंबंधी हाय कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर केजरीवाल आज कोर्टात सुनावणीसाठी उपस्थित झाले होते.  मात्र, त्यांना यापुढच्या सुनावणीसाठी कोर्टात हजर न राहण्याची सवलत देण्यात आली आहे.

दरम्यान, केजरीवाल कोर्टात येणार म्हणून आपच्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या प्रमाणात कोर्टाबाहेर गर्दी केली होती.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2016 01:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...