S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

अहमदनगरमध्ये महिलेला विवस्त्र करुन बेदम मारहाण, 12 नराधम अटकेत

Sachin Salve | Updated On: Jan 19, 2016 10:49 PM IST

rape dsngfsdgअहमदनगर -19 जानेवारी : वैयक्तिक कारणातून महिलेला विवस्त्र करुन बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडली. या प्रकरणी  बारा जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

श्रीगोंदा तालुक्यातल्या वडळीत वैयक्तिक कारणातून पीडित महिलेला गुरुवारी रात्री विवस्त्र करुन धींड काढण्यात आली आणि लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर मार लागल्यानं महिला अत्यवस्थ असून नगर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.

पाठीला, हाताला, पायाला गंभीर मारहाण झाली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आधी शिवाजी वागसकर, कुंडलीक चव्हाणसह चौघंवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर पीडित महिलेचा पुरवणी जबाब घेण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी वाढीव कलम लावली. पोलिसांनी शिवाजी वागसकर, कुंडलीक चव्हाणसह 12 जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. आरोपीमध्ये सहा महिलांचाही समावेश आहे. दरम्यान,गंभीर मारहाण झाल्यानं पीडित महिला अत्यवस्थ असून नगर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.


Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2016 10:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close