नाशिक पालिकेचा इंधन घोटाळा ?, 3 वर्षांत 5 कारसाठी उडवले 5 कोटींचे पेट्रोल !

नाशिक पालिकेचा इंधन घोटाळा ?, 3 वर्षांत 5 कारसाठी उडवले 5 कोटींचे पेट्रोल !

  • Share this:

nashik_municipal

नाशिक - 19 जानेवारी : नाशिक महापालिकेचे पदाधिकारी वापरत असलेल्या वाहनांनी गेल्या 3 वर्षांत चक्क सव्वापाच कोटींची रक्कम फक्त इंधनासाठी खर्च केल्याचं उघड झालंय. माहितीच्या अधिकारात हा खुलासा पालिकेनंच केला आहे. 3 वर्षांत 5 वाहनांसाठी 5 कोटी रुपये असं खर्चाचं अजब समीकरण असलेल्या 5 गाड्यांतील 1 कार ही सभापती शिक्षण मंडळ यांची आहे. पण गेल्या 3 वर्षांत शिक्षण मंडळंच अस्तित्वात नव्हते आणि सभापतीही. मग त्याच्या नावे दाखवलेला या खर्चाचं गोलमाल काय आहे ?  अधिकारी आणि पदाधिकारी यांनी संगनमत करुन तर हा घोटाळा केलाय का ? असे सवाल उभे राहिले आहे

विकासकामांसाठी 400 कोटी कर्ज घेणा-या याच पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं प्रशासन कायम सांगतं. महासभेतही पदाधिकारी प्रशासनाला खर्चावरुन चांगलंच धारेवर धरतात. वसुलीच्या नावानं ठपकाही ठेवतात. पण याच पदाधिका-यांच्या वाहनांसाठी होणारी ही इंधन खर्चाची आकडेवारी ही थक्क करणारी आहे. माहितीच्या अधिकारात जितेंद्र भावे यांना मिळालेली ही कागदपत्रंच बोलकी आहे. पण प्रशासनाच्या अधिका-यांनी दिलेल्या या कागदपत्रात शिक्षण मंडळ सभापतींच्या वाहनासाठी झालेल्या खर्चाचा उल्लेख हा धक्का देणारा आहे. कारण या आकडेवारीच्या 3 वर्षांत शिक्षण मंडळंच अस्तित्वात नव्हतं. खर्च जरी पदाधिका-यांच्या वाहनांनसाठी असला तरी या खर्चावर प्रशासनाचं नियंत्रण असतं. यामुळंच ही उघड झालेली आकडेवारी म्हणजे पालिकेचा इंधन घोटाळा असल्याचा थेट आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते जितेन्द्र भावे यांनी केला आहे.

नाशिक पालिकेचा इंधन घोटाळा

- 3 वषांर्त 5 कारसाठी 5 कोटी इंधन खर्च

- कारच्या किमतीच्या, 8 पट इंधन खर्च फक्त एका वर्षात

- महापौरांच्या वाहनात 4921 लिटर पेट्रोल तर 3926 लिटर डिझेल

- 2012-13 या वर्षांत इंधन खर्च 1 कोटी 98 लाख 25 हजार

- 2013-14 या वर्षांत इंधन खर्च 1 कोटी 27 लाख

- 2014-15 या वर्षांत इंधन खर्च 1 कोटी 89 लाख 89 हजार

- सर्व वाहनं पदाधिका-यांची

- यात महापौरांच्या नावे 2 वाहनं

- तर उपमहापौर,विरोधी पक्षनेता आणि सभापती शिक्षण मंडळ यांच्या 3 कार

- सर्व वाहनं नाशिक पालिकेची

- धक्कादायक म्हणजे 2012 ते 2015 या 3 वर्षात शिक्षण मंडळंच अस्तित्वात नाही

- सभापतीही अस्तित्वात नाही

- मग सभापतींच्या नावे खर्च खरा की खोटा ?

Follow @ibnlokmattv

First Published: Jan 19, 2016 05:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading