अग्नितांडवातून 4 जणांना वाचवणाऱ्या अमोलला हवा मदतीचा हात

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2016 05:18 PM IST

अग्नितांडवातून 4 जणांना वाचवणाऱ्या अमोलला हवा मदतीचा हात

amol_gaikwadबार्शी - 19 जानेवारी : स्वतःचा जीव धोक्यात घालून प्राणाची बाजी लावून मृत्युच्या जबड्यातून चार लोकांचा जीव वाचवणाऱ्या युवकाला आज खितपत पडावं लागत आहे.16 डिसेंबरला कोथरुड(पुणे) येथे लागलेले आगीत चार जणांचा जीव वाचवणारा अमोल हा बार्शीचा असून तो समाजाच्या आर्थिक आणि मानसिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक तरुण मोठ्या शहरात जातात. बार्शीतला अमोल गायकवाड हाही त्यातलाच एक तरुण. दिवसाला 500 रुपये रोजगाराने तो पुण्यातील फॅब्रेकेशनमध्ये कामाला होता. 16 डिसेंबरला 2015 ला पुण्यातील कोथरुड भागात

लागलेल्या आगीत आठ कामगार अडकले होते.आगीत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी अमोल गायकवाड या कामगाराने पत्र्याच्या शेडला लाथा मारून तोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यात यश येत नाही हे पाहिल्यावर त्याने डोक्याने ते शेड तोडले आणि आतील चार कामगारांना वाचवले. डोक्याला झालेल्या गंभीर जखमेने तो जागीच बेशुद्ध झाला त्यात तो 45 टक्के भाजलेला असून त्याच्या डोक्याला 18 टाके पडले आहेत. सध्या बार्शी येथे वैद्यकीय उपचार घेत आहे. अमोलचा एक हात आगीत भाजल्याने निकामी झाला असून त्यावरशस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याच डॉक्टरांचं म्हणणं आहे.

चार जणांना वाचवण्याचं समाधान जरी असलं तरी आणखी चार मित्रांना वाचवण्यात यश न आल्याचं दुख त्याला अजूनही टोचत आहे. अमोलच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून सर्व कुटुंब त्याच्यावर अवलंबून होतं. त्याची आई लोकांच्या घरी धुणी-भांडी करण्याच काम करते तर वडिलांना वयोमानानुसार काम होत नाही. अमोल त्याचे आई,वडील आणि दोन तान्ही मुलं असा परिवार आज कठीण अवस्थेत जगत असून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. आता अमोलला गरज आहे ती मानसिक आणि आर्थिक मदतीची.

Loading...

आपल्याला मदत करायची असेल तर धनादेश अमोलच्या आईच्या नावावर म्हणजेच  काशीबाई मारुती गायकवाड या नावे देऊ शकता

खाते

बँकेचं नाव - एसबीआय (SBI )

खाते क्रमांक 35513817067

IFSC code:-SBIN0006625

शाखा - सुभाषनगर बार्शी, सोलापूर

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2016 05:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...