मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळ दिसले 6 संशयास्पद पॅराग्लाईडर्स

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळ दिसले 6 संशयास्पद पॅराग्लाईडर्स

  • Share this:

paraglading

मुंबई – 18 जानेवारी : मुंबईला पुन्हा एकदा अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळ 6 पॅराग्लाईडर्स उडताना आढळून आल्यानं खळबळ निर्माण झाली आहे.  पवनहंस कंपनीच्या पायलटने तातडीनं या घटनेची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार 13 जानेवारीला पवनहंस कंपनीच्या पायलटने मुंबईत 6 पॅराग्लायडर्सना उतरताना पाहिलं. 13 जानेवारीच्या सकाळी 9 वाजता जुहूजवळ हे पॅराग्लायडर्स दिसलं. पवनहंस कंपनीने तातडीने मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांचं हे पत्र आयबीएन लोकमतच्या हाती लागलंय. पण हे 6 पॅराग्लायडर्स कोण, याबद्दल अजूनही माहिती नाहीये. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. मात्र मुंबईवर झालेल्या 26/11च्या या दहशतवादी हल्ल्यानंतर आढळलेल्या या संशयित पॅराग्लायडर्समुळे मुंबईत सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकादा ऐरणीवर आला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: January 18, 2016, 9:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading