नवाजुद्दीन सिद्दिकीच्या विरोधात महिलेची तक्रार

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या विरोधात महिलेची तक्रार

  • Share this:

M_Id_395434_Nawazuddin_Siddiqui

मुंबई – 17 जानेवारी : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबईतील वर्सोवा  पोलीस ठाण्यात नवाजुद्दीन सिद्दिकीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका महिलेनेही ही तक्रार केली आहे.

नवाजुद्दीन राहत असलेल्या इमारतीखालील गाड्यांच्या पार्किंगवरुन वाद झाला. पार्किंगवरुन वाद सुरू असताना नवाजुद्दीनने गैरवर्तन केलं आणि आपल्यावर हात उगारला, असं या महिलेनी तक्रारीत म्हटलं आहे. महिलेच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी सध्या त्याच्या आगामी 'तीन' सिनेमाच्या शुटींगसाठी कोलकात्यात आहे.

Follow @ibnlokmattv

First published: January 17, 2016, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading