मृत्यूनंतर ही 'तो' झाला अमर, मराठवाड्यात अवयवदानाचा पहिलाच यशस्वी प्रयोग

मृत्यूनंतर ही 'तो' झाला अमर, मराठवाड्यात अवयवदानाचा पहिलाच यशस्वी प्रयोग

  • Share this:

औरंगाबाद - 15 जानेवारी :  सध्या सगळीकडे अवयव दानाबद्दल जागृती करण्यात येते. पण आपल्या नातलगांच्या मृत्यूनंतर त्यांचं अवयवदान करणारे फार कमी असतात. त्यातही मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये अवयव दानासाठी सुविधा उपलब्ध असतात. पण आता मराठवाड्यातही अवयवदानाचा पहिला यशस्वी प्रयोग झाला आहे. अपघातग्रस्त राम मगरच्या कुटुंबीयांनी रामचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे दोन जणांना जीवदान मिळालं.

Ram Magar PKG

बुलडाण्याजवळच्या मेहकरमध्ये राम मगर या तरुणाला गंभीर अपघात झाला. औरंगाबादच्या युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये रामला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण राम ब्रेन डेड अवस्थेत गेला. त्यामुळे त्याचा मेंदू काम करत नव्हता, पण बाकीचे सगळे आवयो सुस्थितीत होते. ब्रेन डेड आसल्याने त्याच्यावर आणखी उपचार करण्याची शक्यता मावळली होती. या घटनेनंतर रामच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं होतं, पण याही स्थितीत त्यांनी रामचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. रामच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर डॉक्टरांनीही तयारी सुरू केली. रामचं लिव्हर आणि त्याच्या किडनी वेगवेगळ्या उपकरणांमध्ये ठेवून त्यासाठी सुसज्ज ऍम्ब्युलन्स तैनात करण्यात आली.

असं झालं अवयवदान

  • युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये अवयव काढले
  • पहाटे 4 वा. लिव्हर आणि किडनी काढली
  • हे अवयव दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची 10 मिनिटांत जय्यत तयारी
  • सिग्मा ते नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये अर्ध्या तासाचं अंतर
  • नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये 3 मिनिटांत पोहोचवली किडनी
  • ग्रीन कॉरिडॉर तयार करून रस्ते ठेवले मोकळे
  • पहाटे 5 वा.10 मि. - रामची दुसरी किडनी ही काढली
  • सिग्मा हॉस्पिटलमधून एअरपोर्टला 3 मिनिटांत पोहोचवली किडनी
  • 5 वा.20 मि. विमानाचं मुंबईकडे उड्डाण

लिव्हर आणि किडनी यांच्या ट्रान्सप्लांटसाठी वेळ वाया जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे औरंगाबादमध्ये यासाठी वाहतुकीचा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. हे अवयव वेळेत पोहोचल्यामुळे मुंबईत आणि औरंगाबादमध्ये, दोन जणांचा जीव वाचला. रामच्या नातेवाईकांनी एवढ्या कठीण परिस्थितीतही केलेलं हे अवयवदान आपल्या सगळ्यांनाच माणुसकीची शिकवण देणारं ठरलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2016 09:10 PM IST

ताज्या बातम्या