News18 Lokmat

स्वत:च्या अंत्यविधीचा निरोप देऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 15, 2016 05:24 PM IST

farmer suicideजालना 15 जानेवारी : कर्जबाजारीपणा आणि मुलीच्या लग्नाच्या चिंतेपायी जालन्यातील आणखी एका शेतकर्‍यानं गळफास लाऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्याच्या आधीच्या दिवशी गावातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्वतःच्या अंत्यविधीच आमंत्रण देऊन शेषराव शेजुळ या 40 वर्षांच्या शेतकर्‍यानं आपलं जीवन संपवल्यानं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केल्या जातीये.

शेषराव शेजुळ यांनी काल गुरुवारी गावातील अनेकांच्या घरी जाऊन आपण कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.

याशिवाय उद्या माझ्या अंत्यविधीला येण्याची विनंती देखील शेजुळ यांनी केली. मात्र ही बाब घरच्यांनी आणि गावकर्‍यांनी फारशी गांभीर्यानं घेतली नाही. दरम्यान आज पहाटे घराच्या पाठीमागे असलेल्या एका लिंबाच्या झाडाला शेषराव यांचा मृतदेह लटकलेला आढळून आला. शेषराव शेजुळ यांना 2 एकर 5 गुंठे जमीन आहे. पावसाअभावी यंदा रानातल सोयाबीन शेंगा लागायच्या आधीच करपून गेलं.रानातल्या पिकाचा हा बेभरवसा पाहून त्यांनी जालन्यात येऊन खाजगी नोकरी किंवा रोजंदारीची कामे देखील केली. दुष्काळामुळे पैशा अभावी संसाराचा गाडा हाकण दिवसेंदिवस अवघड होतं चाललं होतं, त्यातच मुलीच्या लग्नाची चिंता मनात घर करत होती. घर गाडा हाकण्यासाठी खाजगी सावकाराचं 80 हजाराचं कर्ज झाल्याचं देखील त्यांच्या पत्नीचं म्हणणंय. याच चिंतेमुळे त्यांनी जिवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2016 01:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...