अखेर कुलगुरू मिळाले!

अखेर कुलगुरू मिळाले!

26 फेब्रुवारीगेले पाच महिने रेंगाळलेली कुलगुरू निवड प्रक्रिया अखेर आज पूर्ण झाली. यामुळे पुणे, नाशिक, कोल्हापूर, आणि रायगड येथील विद्यापीठांना कुलगुरू मिळाले आहेत. कुलगुरू नियुक्तीची ही अधिकृत घोषणा कुलपती आणि राज्यपाल के. शंकर नारायणन यांच्या ऑफिसातून आज करण्यात आली. त्यानुसार पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. आर. के. शेवगावकर यांची नियुक्ती झाली आहे. ते यापूर्वी आयआयटीमध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागाचे उपसंचालक पदावर कार्यरत होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर पुणे विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. एन. जे. पवार यांची नियुक्ती झाली आहे. तर नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. आर. कृष्णकुमार यांची नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. आर. बी. मानकर यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. मानकर याअगोदर नागपूरच्या लक्ष्मीनारायण तंत्रशिक्षण संस्थेचे संचालक म्हणून काम पाहत होते. या नियुक्त्यांचा गेले 5 महिने घोळ सुरू होता. पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांची केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त होते. डॉ. अरुण अडसूळ हे प्रभारी कुलगुरू म्हणून काम पाहत होते. तर इतर विद्यापीठांच्या कुलगुरूंची मुदत संपल्याने तेथे नव्याने नियुक्त्या होण्याची प्रतीक्षा होती. या पदांसाठी तत्कालीन राज्यपाल एस. सी. जमीर यांनी मुलाखतीही घेतल्या होत्या. पण त्यांची बदली झाल्याने या नियुक्त्या रखडल्या होत्या.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2010 11:52 AM IST

ताज्या बातम्या