जकार्ता - 14 जानेवारी : : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता एकापाठोपाठ झालेल्या साखळी स्फोटाने हादरलीये. सहा ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 6 जण ठार झाले आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालय आणि मॉलजवळ हे साखळी स्फोट झाले. आत्मघातकी हल्लेखोरांनी हे स्फोट घडवून आणले. स्फोटानंतर पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये मोठी चकमक घडली. 3 आत्मघातकी हल्लेखोरांनी स्वता:ला स्फोटांनी उठवलं असल्याचा दावा पोलिसांनी केला.
जकार्तामधील शरीना शॉपिंग सेंटर आणि राष्ट्रपती पॅलेस आणि संयुक्त राष्ट्राच्या ऑफिसजवळ एकापाठोपाठ हे सहा स्फोट झाले. प्रत्यक्षदशीर्ंनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही ऑफिसमधून स्फोटांचा आणि गोळीबाराचा आवाज येत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ते 14 हल्लेखोर यात सहभाग होते. या हल्ल्यात तीन पोलिसांसह तीन नागरिकांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी चार हल्लेखोरांना ठार मारलंय तर 3 हल्लेखोरांनी स्वत:ला बॉम्ब लावून स्फोट घडवलाय.
एकापाठोपाठ सहा स्फोटांमुळे शहरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं. नागरिकांनाही ऑफिस आणि घराच्या बाहेर निघण्यास मनाई करण्यात आलीये. अजूनपर्यंत हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकलं नाही. हल्लेखोरांनी या मॉलजवळच्या पोलीस स्टेशनला लक्ष्य केलं असल्याचा संशय आहे. पण, या स्फोटात शासकीय इमारतींना लक्ष करण्यात आलंय.
Follow @ibnlokmattv |