पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनू शकतं - ओबामा

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनू शकतं - ओबामा

  • Share this:

barack-obama-state_3547919b

13 जानेवारी : पाकिस्तान, अफगाणिस्तानसह जगातील अनेक भागांमध्ये पुढची काही दशके अस्थिरता कायम राहील. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान भविष्यात दहशतवाद्यांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण बनू शकतं, आशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बुधवारी पाकिस्तानवर ताशेरे ओढले.

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांनी आज (बुधवारी) आपलं शेवटचं भाषण केलं. 'स्टेट ऑफ द युनियन अड्रेस' म्हणून संबोधल्या जाणार्‍या या भाषणात ओबामा यांनी अमेरिका आणि जगातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच, दहशतवादापासून अमेरिकेला असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधलं.

अल कायदा आणि इसिस या दोन्ही संघटना आपल्या लोकांना थेट धोका निर्माण करीत आहेत. कारण आजच्या जगामध्ये ज्यांना स्वत:सह इतर मानवी जीवांची कसलीही किंमत नाही ते खूप नुकसान करू शकतात. इसिस संघटना नसती तरी, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अन्य काही देशांमध्ये अजून काही वर्षं अस्थिरता कायम राहिली असती. पाकिस्तान, अफगाणिस्तान हे भाग अतिरेक्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनू शकतं, या धोक्याकडेही ओबामांनी लक्ष वेधलं.

दरम्यान या भाषणादरम्यान मिशेल ओबामांच्या शेजारची एक खुर्ची रिकामी होती. अमेरिकेत गोळीबारात ज्यांचा मृत्यू झालाय, त्यांना आदरांजली म्हणून ही खुर्ची रिकामी होती.

काँग्रेससमोर ओबामांचं भाषण : आयसिस, पाकवर ओढले ताशेरे

आधी अल कायदा आणि आता आयसिसपासून आपल्या लोकांना थेट धोका आहे. कारण आजच्या जगात 2-3 दहशतवादीही खूप नुकसान करू शकतात. पण सध्या तिसरं महायुद्ध सुरू आहे असं म्हणणं म्हणजे आयसिसच्या जाळ्यात फसण्यासारखं आहे. ते खुनी आणि जहाल आहेत. आणि त्यांना त्याच नावानं ओळखलं पाहिजे. त्यांना शोधून त्यांचा नाश केलाच पाहिजे. आतापर्यंत आपण आयसिसवर 10 हजारपेक्षा जास्त हवाई केले आहेत. यानं त्यांचं नेतृत्व, तेल, प्रशिक्षण केंद्र आणि त्यांची शस्त्र नष्ट होत आहेत. सीरिया आणि इराकमध्ये आयसिसशी लढणार्‍या यंत्रणांना आपण प्रशिक्षण देतोय. न्याय व्हावा ह्या आमच्या निर्धारावर तुम्हाला शंका असेल, तर ओसामा बिन लादेनला विचारा! अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि आफ्रिकेतले काही देश भविष्यात दहशतवाद्यांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण बनू शकतात. काही भागात दहशतवाद आणि उपासमारीमुळे नवीन निर्वासित तयार होतील. या समस्या सोडवताना जग मार्गदर्शनासाठी आपल्याकडे बघेल. आणि जगानं आपल्याला विचारल्यावर फक्त तीव्र भाषा वापरून चालणार नाही. त्याहून खूप जास्त आपल्याला करावं लागणार आहे. क्युबा या देशाला 50 वर्षं वाळीत टाकूनही तिथे लोकशाही प्रस्थापित झाली नाहीच. म्हणून क्युबाशी राजनैतिक संबंध आपण पुन्हा प्रस्थापित केले. पर्यटन आणि व्यापार पुन्हा सुरू केला. क्युबन नागरिकांचं आयुष्य सुकर करण्याचे प्रयत्न आपण केले. आपलं नेतृत्व आणि विश्वसनीयता जर आणखी मजबूत करायची असेल, तर शीतयुद्ध संपलंय हे मान्य करावंच लागेल.

Follow @ibnlokmattv

First published: January 13, 2016, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading