S M L

निवृत्तीनंतर खेळ आणि फिटनेस वेंचरमध्ये गुंतवणूक करतात बहुतांश खेळाडू

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2016 06:49 PM IST

निवृत्तीनंतर खेळ आणि फिटनेस वेंचरमध्ये गुंतवणूक करतात बहुतांश खेळाडू

एक खेळाडू जसा वयाच्या चाळीशीच्या आसपास पोहोचतो, तशीच त्याच्या निवृत्तीची वेळ येते. परंतु, नेमबाजी, बुद्धीबळ यांसारखे खेळ याला अपवाद ठरतात. ज्यामध्ये शारिरीकपेक्षा मानसिक शक्ती जास्त महत्त्वाची ठरते. पण इतर खेळात मात्र तेच सत्य आहे.

भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी गेल्या दोन वर्षात या खेळाला निरोप दिला आहे. सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपली मशाल पुढील पिढीच्या हाती सोपवलीये. अलीकडेच वीरेंद्र सेहवाग आणि जहीर खानने देखिल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारताच्या सर्वात प्रसिद्ध फुटबॉल आयकॉनची पण अशीच कहाणी आहे. या सार्‍या नावांना वेगळ्या परिचयाची अशी गरज नाही आणि निवृत्तीनंतरही त्यांच्याकडे करण्यासारखं बरंच काही आहे. पण या सर्वांमध्ये एका गोष्टीचं साम्य आहे ते म्हणजे या सर्व दिग्गजांनी त्यांच्या निवृत्तीनंतर कोणत्या न कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक पक्की केली होती. चला तर बघूया या प्रसिद्ध खेळाडूंनी निवृत्तीनंतरच्या त्यांच्या आयुष्यासाठी काय योजना केल्या आहेत.

sachin-statement-in-preity-zinta-caseसचिन तेंडुलकर (नोव्हेंबर 2013 मध्ये निवृत्त) : जगातील महान फलंदाजांमधील एक असलेल्या सचिन तेंडुलकरने अलीकडेच सुरू झालेल्या इंडियन फुटबॉल लीग (आईएसएल) मधील केरळ संघ विकत घेतला. या संघाला केरळ ब्लास्टर्स असे नाव दिले गेले आहे.

Gangullyसौरव गांगुली (2008 मध्ये निवृत्त) : भारताचे सर्वात आक्रमक आणि यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीचे फुटबॉलवरील प्रेम काही लपून राहिलं नाही. हर्षवर्धन नियोटिया, संजीव गोयंका, उत्सव पारीख यांच्याशी भागीदारी केली आणि स्पेनच्या एटलेटिको मैड्रिड या मोठ्या फुटबॉल क्लबशी हात मिळवून गांगुलीने आईएसएलमध्ये एटलेटिको डी कोलकाता विकत घेतला. ज्याने इंडियन फुटबॉल लीग (आईएसएल) च्या पहिलाच सीझन जिंकून धमाकेदार सुरुवात केली.

baichung_bhutiaबाईचुंग भूटिया (ऑगस्ट 2011 मध्ये निवृत्त) : भारताचे स्टार स्ट्राइकर बाईचुंग भूटिया याने बाईचुंग भूटिया फुटबॉल शाळेची ऑक्टोबर 2010 मध्ये स्थापना केली. त्याने फुटबॉलर कार्लोस क्युरेज आणि स्पोर्ट्समधील प्रसिद्ध ब्रँड नाईकी सोबत मिळून या शाळेची स्थापना केली. दहा महिन्यांनतर ऑगस्ट 2011 मध्ये भूटियाने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम केला.

Loading...

zahir khanजहीर खान (ऑक्टोबर 2015 मध्ये निवृत्त) : भारताचा महान डावखुरा गोलंदाज प्रोस्पोर्ट नावाची कंपनी चालवतो. ही कंपनी फिटनेस प्रशिक्षण आणि फिजिओथेरेपीच्या सेवा उपलब्ध करून देते. भारतीय संघाचे माजी फिजियोथेरेपिस्ट एंड्रयू लिपस आणि फिटनेस ट्रेनर एड्रियन लेरोक्स पण या कंपनीशी जोडले आहेत.

एका उज्ज्वल करिअर नंतर निवृत्तीबद्दल विचार करणे लोकांना खूप अस्वस्थ करू शकतो आणि हा कोणासाठीही प्रचंड कठीण निर्णय ठरू शकतो. असे निर्णय घेण्यापूर्वी बरीच तयारी आणि धोरणांची आवश्यकता पडते. म्हणून एचडीएफसी जीवन निवृत्त योजना  अशाच परिस्थितींसाठी ही योजना बनवली गेली असून ही काम करणार्‍या तरूणांसाठी निवृत्त योजना बनवते वेळी खूपच प्रभावी ठरू शकते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2016 12:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close