एफआरपी न देणार्‍या 12 साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द

एफआरपी न देणार्‍या 12 साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द

  • Share this:

sugarcane farmenr231

11 जानेवारी : एफआरपीनुसार दर न देणार्‍या साखरसम्राटांना साखर आयुक्तांनी दणका दिला आहे. राज्यातील 12 साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती साखर आयुक्त बिपिन शर्मा यांनी दिली आहे.

एफआरपीनुसार जर कोणता साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकर्‍यांना हप्ता देणार नसेल, त्यांच्यावर कारवाईचा इशारा त्यांनी याआधीच दिला होता. त्यानुसार एफआरपी न देणार्‍या या 12 कारखान्यांवर साखर आयुक्तांनी कारवाई केली आहे. त्यात सांगली जिल्ह्यातले 3 तर नगर जिल्ह्यातले 3 कारखाने आहेत. या 12 कारखान्यांची गेल्या वर्षाची थकित एफआरपीची रक्कम 200 कोटींच्या घरात आहे. तसंच तसेच गेल्या वर्षीच्या शेतकर्‍यांची थकीत रक्कम न दिलेल्या 13 कराखान्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं बिपिन शर्मा यांनी सांगितलं आहे.

साखर कारखान्यांना दणका : 12 कारखान्यांचे गाळप परवाने रद्द

  • पुणे - भीमा-पाटस सह. साखर कारखाना
  • सातारा- प्रतापगड आणि किसनवीर सह. साखर कारखाना
  • सांगली- महाकाली, माणगंगा, यशवंत सह. साखर कारखाना
  • सोलापूर- शंकर, कुर्मदास आणि शंकररत्न सह. साखर कारखाना
  • अहमदनगर- अगस्ती, वृद्धेश्वर, प्रसाद शुगर
  • नाशिक- गिरनार सह. साखर कारखाना

Follow @ibnlokmattv

First published: January 11, 2016, 9:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading