नगर पंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेसचा झेंडा, भाजपची धुळदाण

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 11, 2016 04:22 PM IST

नगर पंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेसचा झेंडा, भाजपची धुळदाण

nagarpanchyat_cong11 जानेवारी : विधानसभेत दारुण पराभवानंतर पिछेहाट झालेल्या काँग्रेसने आता स्थानिक निवडणुकीत आगेकूच केल्याचं चित्र आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निकालात काँग्रेसने 289 जागांपैकी 107 जागा जिंकत दणदणीत यश मिळवलं आहे. काँग्रेसने एकूण 7 नगर पंचायतीत बहुमत मिळालंय. सत्ताधारी भाजपला अवघ्या 24 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेनेनं 55 जागा पटकावत आपणच मोठे भाऊ असल्याचं दाखवून दिलं.

नांदेड जिल्ह्यात हिमायत नगर आणि नायगाव, उस्मानाबादेत वाशी, नंदुरबारमध्ये अकराणी वाडफळ्या, नाशिकमध्ये दिंडोरी

आणि चंद्रपूरमध्ये कोरपण आणि जिवती विभागात नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी 289 जागांसाठी निवडणूक पार पडली. काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत 107 जागा पटकावल्यात. 7 ठिकाणी काँग्रेसला बहुमत मिळालं. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही जामखेड नगरपरिषदेसह 58 जागा जिंकल्यात. तर शिवसेनेनं 55 जागा पटकावल्यात. मात्र, सत्ताधारी भाजपला अवघ्या 24 जागा मिळाल्यात. विनायक मेटेंच्या शिवसंग्राम आणि पीपल वर्किंग पार्टी आणि मनसेनं प्रत्येकी 4 जागा जिंकल्यात. 2 नगर नगरपरिषदांमध्ये निवडणूक तर इतर ठिकाणच्या रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक झाली होती.

रायगडमध्ये सेना-राष्ट्रवादीने बालकिल्ले राखले

रायगड जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या 5 नगर पंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपापले बालेकिल्ले राखले असले तरी खालापुरात शिवसेनेला धक्का देत शेकापने लालबावटा फडकवला आहे. पोलादपूर आणि तळा नगरपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला तर म्हसळा आणि माणगाव या दोन्ही ग्रामपंचायती राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. खालापूर ग्रामपंचायतीवर यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती. नगरपंचायत निर्माण झाल्यानंतर मात्र शेकापने सत्ता प्रस्थापित केली आहे. माणगाव नगरपंचायत जिंकण्यासाठी शिवसेनेने सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता राखली. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने जिल्ह्यात 19 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. परंतु त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

Loading...

चेंबुर घाटला पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अनिल पाटणकर विजयी

मुंबई महानगरपालिकेची चेंबूर घाटला येथील प्रभाग 147 ची पोटनिवडणूक झाली यात शिवसेनेचे उमेदवार अनिल पाटणकर यांनी 6627 मत घेऊन विजय मिळवला. काँग्रेस पक्षाचे राजेंद्र नगराळे हे दुसर्‍या स्थानी होते तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नागेश तवटे याना तिसर्‍या क्रमांकाची 4317 मतं मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र  नगराळेंनी 4890 मतं मिळवली. परंतु, हा विजय मिळवण्यासाठी मात्र शिवसेनेला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2016 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...