जगातला मोस्ट वाँटेड ड्रग्ज माफिया एल चॅपो गजाआड

जगातला मोस्ट वाँटेड ड्रग्ज माफिया एल चॅपो गजाआड

  • Share this:

drug_mafiya11 जानेवारी : मेक्सिकोत अटक करण्यात आलेला जगातला मोस्ट वाँटेड ड्रग्ज माफिया एल चॅपो गुस्मान लोएरा याला अमेरिकेच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचं मेक्सिकोनं जाहीर केलंय. शुक्रवारी चॅपोला मेक्सिकोत अटक करण्यात आली होती.

या आधीही तो दोन वेळा तुरूंगातून पसार झाला होता. जेलमधून दीड किलोमीटर लांबीचा बोगदा खणून सहा महिन्यांपूर्वी तो तिसर्‍यांदा फरार झाला होता.

अमेरिकेनं त्याच्या नावावर तब्बल 50 लाख डॉलरचं बक्षीसही ठेवलं होतं. कोकेन, हेरॉईन आणि एमडीची तस्करी करून त्यानं अमेरिकेत आपलं साम्राज्य उभारलं होतं. जगातल्या अनेक देशांमध्ये त्याचं जाळं असून इंटरपोलही त्याच्या मागावर होतं.

Follow @ibnlokmattv

First published: January 11, 2016, 12:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading