S M L

अनुष्का बनणार 'सुलतान'ची बेगम

Samruddha Bhambure | Updated On: Jan 9, 2016 05:10 PM IST

अनुष्का बनणार 'सुलतान'ची बेगम

09 जानेवारी : अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित 'सुलतान' चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका निभावणार याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. सध्याची आघाडीची अभिनेत्री असलेली अनुष्का शर्मा सलमानसोबत या चित्रपटात झळकणार आहे.

'सुलतान' चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर अनुष्का-सलमानचा फोटो अपलोड करू याबाबतची माहिती देण्यात आली असून अनुष्का शर्मानेही तिच्या ट्विटर अकाऊंटवर ही न्यूज शेअर केली आहे.

आदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अली अब्बास झफरचे आहे. हरियाणी कुस्तीपटूच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे चित्रीकरण कर्जतमध्ये होत आहे. कुस्तीपटूच्या भूमिका साकारण्यासाठी सलमानने कुस्तीचे खास प्रशिक्षण घेतलं आहे. तसंच, त्याने मिक्स मार्शल आर्टचेही धडे घेतले. या वर्षीच्या ईदला 'सुलतान' प्रदर्शित होणार आहे.

आमिर, शाहरुखनंतर आता अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलीवूडचा दबंग खान सलमानसोबत काम करणार आहे. पदार्पणातच तिने शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी', आणि त्यानंतर 'जब तक है जान'मध्ये काम केलं. गेल्या वर्षी आलेल्या 'पीके'मध्ये ती आमिर खानसोबत झळकली, आणि आता सुलतानद्वारे ती सलमानसोबत काम करणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2016 05:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close