S M L

शाहरुख आणि आमीरच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांकडून कपात

Samruddha Bhambure | Updated On: Jan 8, 2016 12:45 PM IST

शाहरुख आणि आमीरच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांकडून कपात

08 जानेवारी : शाहरुख खान, आमीर खानसह 13 जणांच्या पोलीस सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या दोघांबरोबर प्रत्येकी 2 सशस्त्र पोलीस कर्मचारी असतील. तर बॉलीवूड दिग्दर्शक-निर्माता विधू विनोद चोप्रा, दिग्दर्शक राजकुमार हिराणी, दिग्दर्शक फराह खान, निर्माता अली आणि करीम मोरानी यांच्यासह 25 जणांचं पोलीस सुरक्षा पूर्णपणे काढून घेण्यात आली आहे.

असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आमीर आणि शाहरुखच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. तसंच, बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांना गुन्हेगारी जगतातून धमक्या देण्यात आल्यानंतर त्यांना संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांना घेतलेल्या आढाव्यानुसार सध्याच्या परिस्थितीत या सेलिब्रिटींना कोणताही धोका नसल्यामुळे त्यांची पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

सेलिब्रिटींना सुरक्षा देणं म्हणजे पोलिसांचं मनुष्यबळ वाया घालवण्यासारखं आहे, अनेक प्रसिद्ध व्यक्तींना केवळ देखाव्यासाठी संरक्षण हवे असते, असं पोलिसांनी म्हटलंय.

अभिनेता अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, अक्षय कुमार, महेश मांजरेकर, महेश आणि मुकेश भट्ट आणि दिग्दर्शक निखिल अडवाणी यांचे संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. यापूवच् मुंबई पोलिसांकडून बॉलिवूडमधील 40 हून अधिक लोकांना संरक्षण दिले गेले होते.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2016 11:40 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close