S M L

सहकारी बँकाची दुसरी बाजूही जाणून घ्या, पवारांची निवडणूक बंदीवर नाराजी

Sachin Salve | Updated On: Jan 7, 2016 06:41 PM IST

cm vs pawar 4407 जानेवारी : शिखर बँकेच्या संचालकांवरील निवडणूक बंदीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी नाराजी व्यक्त केलीय. सरकारने सहकारी बँकांच्या एनपीएबाबत दुसरी बाजूही जाणून घ्यावी, असं मत पवारांनी व्यक्त केलंय. वसंतदादा शुगर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे मत व्यक्त केलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षांत ज्या बँकांची संचालक मंडळं रिझर्व बँकेनं बरखास्त केली असतील त्या संचालकांना पुढच्या दहा वर्षात निवडणूक

लढवता येणार आही. या बाबतचा निर्णय मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. या निर्णयामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहकारावरच्या वर्चस्वाला हादरा बसेल असं मानलं जातंय. अजित पवारांसह इतर दिग्गज नेत्यांना यामुळे सहकारी बँकाची निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळेच आज वसंततदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्यामुळे या मुद्द्यावर दोघेही काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष होतं. पवारांनी जाहीरपणे यावर नाराजी व्यक्त केलीये. राज्य सरकारने काही कठोर निर्णय घेतले त्याचं स्वागत आहे. पण, हे निर्णय घेत असतांना त्या बँकांची दुसरी बाजूही पाहिली गेली पाहिजे. आयडीबीआय या बँकेकडे 15 हजार कोटींची थकबाकी आहे पण त्यांच्या संचालक मंडळावर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही कारवाई केली नाही अशी नाराजी शरद पवारांनी व्यक्त केली.

पवारांच्या या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी याच कार्यक्रमात प्रत्युत्तर दिलं. बँक संचालकांवरील कारवाई अजिबात सुडबुद्धीतून केलेली नसून आम्ही या प्रकरणाची दुसरी बाजू निश्चितच तपासून पाहू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पवारांना दिलंय. सहकार क्षेत्राला शिस्त

लावण्यासाठीच हा कठोर निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2016 04:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close