दिवाकर रावतेंच्या गाडीला अपघात, रावते सुखरुप

 दिवाकर रावतेंच्या गाडीला अपघात, रावते सुखरुप

  • Share this:

divakar_Ravate_car_accident06 जानेवारी : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या गाडीला गंभीर अपघात झालाय. या अपघातात गाडीचं प्रचंड नुकसान झालंय. लोअर परळ इथल्या फिनिक्स मिलजवळ हा अपघात झाला. या अपघातात रावते यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

महालक्ष्मीच्या दिशेने जाणार्‍या स्विफ्ट डिझायर गाडीने अचानक यु टन घेतला आणि दादरच्या दिशेने जाणार्‍या रावतेंच्या गाडीवर येऊन धडकली. या अपघातात रावतेंच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातानंतर लगेचच शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. रावतेंना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना लगेचच उपचाराकरता जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: January 6, 2016, 4:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading