संजय दत्त फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुटणार ?

संजय दत्त  फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुटणार ?

  • Share this:

ECC_1434433787_16june2015_SanjayDutt

06 जानेवारी : मुंबई बॉम्बफोट हल्ल्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा कारागहात शिक्षा भोगत असलेला बॉलीवूडचा अभिनेता संजय दत्त आता कायमचा तुरूंगाबाहेर येणार आहे. येत्या फेबुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयात तो तुरूंगातून सुटणार असल्याचं माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी संजय दत्तची उर्वरित शिक्षा माफ करण्याची परवानगी दिल्याचं समजते. तुरूंगात चांगल्या वार्तनाच्या बदल्यात सर्व कैद्यांना 114 दिवसांची सूट मिळते. त्यामुळे त्याच्या शिक्षेत कपात करत त्याची साडेतीन महिनेआधी सुटका करण्यात येणार असल्याचं गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं. मात्र, यासंदर्भात गृहविभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मुंबईतील 1993च्या साखळी बॉम्बस्फोटावेळी संजय दत्तला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यातील दीड वर्षांची शिक्षा त्याने न्यायालयीन सुनावणी सुरू असताना भोगली. तर, उर्वरित सोडतीन वर्षांची तो सध्या शिक्षा पुण्यातील येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत आहे.

दरम्यान, गेल्या जानेवारीमध्ये संजय दत्त सुट्टीनंतर 2 दिवस उशिरा जेलमध्ये गेला होता. पण ही त्याची चूक नसून सुट्टी वाढवायची का, यावर जेल प्रशासनाकडून वेळेत उत्तर आलं नाही, असं या चौकशीत समोर आलं. त्यामुळे आता संजूबाबाच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: January 6, 2016, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading