IBN लोकमतचा दणका, रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार शिवजंयतीचीही सुट्टी

IBN लोकमतचा दणका, रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार शिवजंयतीचीही सुट्टी

  • Share this:

cst_station copy05 जानेवारी : अखेर रेल्वे प्रशासनाला आपली चूक कळाली असून रेल्वे कर्मचाऱ्यांना आता शिवजयंतीलाही सुट्टी देणार असल्याचं जाहीर केलंय. रेल्वे प्रशासनाचा विसरभोळा कारभार आयबीएन लोकमतने उजेडात आणला होता. आज याबाबत मनसेनं आंदोलन केलं. त्यानंतर प्रशासनाने झाली चूक मागे घेतलीये.

मुख्यालयाचं छत्रपती शिवाजी टर्मिनस नाव मिरवणाऱ्या रेल्वेला शिवाजी महाराजांचाच विसर पडल्याचं समोर आलं होतं. रेल्वेच्या यावर्षीच्या सुट्‌ट्यांच्या यादीतून शिवजयंती गायब झाल्याचा आरोप रेल्वे कामगार संघटनांनी केला होता. रेल्वेनं 12 दिवसांच्या सुट्‌ट्यांची यादी प्रसिद्ध केलीय. पण त्यात शिवजयंतीचा उल्लेख नाही, असा आरोप रेल्वे कामगार संघटनांनी केला होता. रेल्वेच्या गेल्यावर्षीच्या परिपत्रकात शिवजयंतीच्या सुट्टीचा समावेश होता. या प्रकरणी आज मनसेनं आंदोलन केलं.आपली झालेली चूक सुधारत प्रशासनाने अखेर 19 फेब्रुवारीला शिवजयंतीची सुट्टी जाहीर केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: January 5, 2016, 4:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading