'त्या' प्रत्यक्षदर्शीची काळजी, 'सनातन'चं पोलिसांना खळबळजनक पत्र

'त्या' प्रत्यक्षदर्शीची काळजी, 'सनातन'चं पोलिसांना खळबळजनक पत्र

  • Share this:

pansare new

05 जानेवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सनातन संस्थेचं एक खळबळजनक पत्र राजारामपुरी पोलिसांना आलं आहे. कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबाबत काळजी व्यक्त करणारं पत्र सनातन संस्थेनं पोलिसांना पाठवलं आहे.

सनातनच्या वतीनं संजीव पुनाळकर यांनी संस्थेच्या लेटरहेडवर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना हे पत्र पाठवलं आहे. प्रत्यक्षदर्शी मुलाच्या जीवितास काही बरं वाईट झालं तर त्याचं खापर सनातन संस्थेवर फोडू नये, अशा आशयाचं पत्र पोलिसांना पाठवण्यात आलं आहे. या पत्रामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, सनातन संस्था अशा प्रकारचं पत्र कशी काय लिहू शकते असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: January 5, 2016, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading