03 जानेवारी : पुण्यातील ससून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर समृद्ध जीवन ग्रुपचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांचा ताबा आता ओडिशा पोलिसांकडे देण्यात आला आहे. उस्मानाबादमधील उमरगा न्यायालयाने यासंदर्भातली परवानगी दिली आहे.
कोट्यवधींच्या घोटाळ्यासाठी महाराष्ट्रासोबत ओडिशा, मध्यप्रदेश राज्यातही मोतेवारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या घोटाळ्याप्रकरणी त्यांचा ताबा घेण्यासाठी इतर राज्यातल्या पोलिसांनीही न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे मोतेवारांविरोधातल्या अडचणींमध्ये वाढ होणार असचं दिसतं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा