अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शीतल साठेंचा कार्यक्रम उधळला

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शीतल साठेंचा कार्यक्रम उधळला

  • Share this:

 

solapur_Abvp02 जानेवारी : सोलापुरातमध्ये कबीर कला मंचाच्या सदस्या शीतल साठे यांचा कार्यक्रम अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी उधळलाय. अभाविपचे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीतर तर आयोजक लक्ष्मण ढोबळे आणि अभिजीत ढोबळेंना सळईने मारहाण केली.

शीतल यांचा विद्रोही गाण्यांचा कार्यक्रम शहरातील सोनिया कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता. शीतल साठेंवर नक्षलवादी कारवाया केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच शीतल साठेंनी कार्यक्रम करू नये अशी मागणी अभाविपने केली होती. याविरोधात कार्यक्रम होऊ न देण्यासाठी आयुक्तांकडे निवेदन केलं होतं. पण ऐन कार्यक्रमास्थळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत कार्यक्रम उधळवून लावला. आयोजक लक्ष्मण ढोबळे आणि अभिजीत ढोबळेंना सळईने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये. पोलिसांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

 

First published: January 2, 2016, 9:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading