अखेर काशीकपडी समाजातील 5 पंचाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

  • Share this:

kashipada_Samaj_jatpanchyat02 जानेवारी : काशीकापडी समाजाच्या जातपंचायतीचा इतका जाच आहे की, त्यांनी चक्क आईला आणि मुलीलाच एकमेकांपासून दूर केलं आहे. सध्या नाशिकमध्ये राहणार्‍या कोमल वर्दे या मुलीच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तिनं समाजामध्ये असलेल्या अनिष्ट प्रथांच्या विरोधात एल्गार पुकारला आणि त्यावरुन समाजातलं सत्य बाहेर आलं. अखेर या प्रकरणी नऊ पंचांविरोधात येवला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालीये. ही तक्रार तपासासाठी पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलीये.

कोमल वर्दे या तरुणीनं जातपंचायतीविरोधात एल्गार पुकारला होता. कोमल वर्दे हिचे वडील शंकर मोतीराम वाटमकर यांचं गेल्या गुरुवारी पुण्यात निधन झालं. पतीच्या निधनानंतर त्या महिलेला तूप लावून प्रेतासोबत आंघोळ घातली जाते. इतकंच नाही तर तिला दहाव्या दिवशी तिला संपूर्ण अंधार्‍या खोलीत दिवसभर डांबून ठेवलं जातं. तिचं कोणीही तोंड पहायचं नाही अशा अनेक अघोरी गोष्टी केल्या जातात. याचविरोधात कोमलनं आवाज उठवला, पण काशीकापडी समाजाच्या पुण्यातले तिच्या आईला मुलगी हवी की पंच हवेत असा सवाल केला. याचाच दबाव येऊन आईनं पंच हवे म्हणून सांगितलं आणि कोमलला वडिलांचं अंत्यदर्शन न घेता परतावं लागलं. कोमलनं मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2016 08:22 PM IST

ताज्या बातम्या