पोलीस ठाणे हवे तर क्राईम रेट वाढवा, गृहराज्य मंत्र्यांचा अजब सल्ला

पोलीस ठाणे हवे तर क्राईम रेट वाढवा, गृहराज्य मंत्र्यांचा अजब सल्ला

  • Share this:

ram_shinde02 जानेवारी : अहमदनगर जिल्ह्यात पाच पोलीस ठाणे प्रलंबित आहेत. मात्र क्राईम रेट कमी असल्यास पोलीस ठाणे मंजूर करता येत नाही. त्यामुळं तुम्हाला काही कमी पडलं तर क्राईम रेट वाढवणे हाती घ्यावं लागेल, असा अजब सल्ला गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी दिलाय. गृहराज्य मंत्र्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलंय.

राज्यात सध्या नगरसह अनेक येथील पोलीस ठाणे प्रलंबित आहेत. मात्र नवीन पोलीस ठाणे मंजूर करायचं असेल तर क्राइम रेट वाढवावा लागतो. त्यामुळं तुम्हाला काही कमी पडलं तर क्राइम रेट वाढवणे हाती घ्यावं लागेल, हे मला गृहराज्यमंत्री झाल्यानंतर समजल्याची मुक्ताफळं राम शिंदेंनी उधळली आहेत. अहमदनगरला पोलीस स्टेशन इमारतीच्या उद्घाटनवेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर यावेळी गृह विभागचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग आणि विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीत सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राम शिंदे यांच्या विधानानंतर, प्रत्यक्षात काही भागात पोलीस स्टेशन मंजूर करायंच असेल तर त्यासाठी कुठल्या बाबींची आवश्यकता असते हे ते पाहुया...

अशी असते पोलीस स्टेशन निर्मितीची प्रक्रिया

- निकष काय ?

- त्या भागाचं सर्वेक्षण करावं लागतं

- भौगौलिक स्थितीचा विचार, लोकसंख्या काय आहे?

- पोलीस स्टेशन लोकांना सोईस्कर आहे का याची चाचपणी

- त्या भागातील क्राईम रेट काय आहे ?

- त्यानंतर प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवले जातात

- मंजुरीनंतर पोलीस स्टेशन अस्तित्वात येतं

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: January 2, 2016, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading