भंडार्‍यात 11 लाखांचा दारूसाठा जप्त

भंडार्‍यात 11 लाखांचा दारूसाठा जप्त

  • Share this:

bhandra_news31 डिसेंबर : नवीन वर्षाची सगळ्यांना चाहुल लागली असताना भंडार्‍यात 31 डिसेंबरच्या आदल्याच दिवशी 11 लाखांची देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या निमित्ताने दारूबंदी असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये भंडारा-गोंदियामधून मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक करणारे सक्रीय झाल्याची माहिती भंडारा राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्याच्या आधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी गेल्या 2 दिवसातला अवैध दारूचा साठा जप्त केलाय.

राज्य उत्पादन शुल्क भंडारा विभागाने मागील 2 दिवसांच्या धाडीत देशी-विदेशी आणि मोहा अशी 11 लाखांची दारू जप्त केली आहे.

31 डिसेंबर निमित्ताने ज्या जिल्ह्यात दारू बंद आहे आहे त्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात भंडारा गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक करणारे सक्रीय झाले आहेत. याची माहिती भंडारा राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर

गेल्या 2 दिवसात देशी विदेशी आणि मोहाची अवैध दारू मोठ्या प्रमाणात पकडली आहे. पहिल्या दिवशी 5 लाखांची देशी आणि विदेशी दारू वाहतूक करणार्‍या 2 गाड्या जप्त केल्या तर त्याच रात्री मोहाचे वाहतूक करणारी गाडी जप्त करण्यात आली. बुधवारी रात्री फिरत्या भरारी पथकाने लाखांदूर मार्गावर 6 लाखांची देशी दारू जप्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2015 12:01 PM IST

ताज्या बातम्या