पाचवी आणि आठवीची परीक्षा अनिवार्य करा,तावडेंची मागणी

  • Share this:

vinod tawade 4322331 डिसेंबर : पहिले ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करणार्‍याच्या धोरणात बदल होण्याची शक्यता आहे. पाचवी आणि आठवीची परीक्षा अनिवार्य करा अशी शिफारस शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलीये. विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील नेमण्यात आलेल्या समितीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे अहवाल सादर केलाय. विद्यार्थी उत्तीर्ण झालं तरच पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल असंही या समितीने सुचवलेलं आहे.

केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळांतर्गंत शालेय शिक्षणाबाबत विना अडथळा धोरणावर ( नो डिटेंशन पॉलीसी ) फेरविचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत तावडेंनी शालेय विद्यार्थ्यांची इयत्ता 5 वी आणि 8 वीत परीक्षा घेण्यात यावी जर त्यात तो विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास पुन्हा एक महिन्याने त्याची परिक्षा घेतली पाहिजे. ही परीक्षा तो उत्तीर्ण न झाल्यास त्याला पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येऊ नये. त्यामुळे विद्यार्थी कच्चा राहणार नाही आणि शिक्षणाचा दर्जाही राखला जाईल, असं मत व्यक्त केलं.

तसंच विद्यार्थ्यांची गळती कमी करताना त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. विद्यार्थ्यांची पहिली ते चौथी दरवर्षी परीक्षा घेण्यात यावी त्याला पुढल्या वर्गात प्रवेश द्यावा. मात्र, 5 वी व 8 वीत विद्यार्थ्यांना परीक्षा अनिवार्य करण्यात यावी,

शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. पुढील आठवडयात विविध राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांचा समावेश असलेली ही उपसमिती आपला अहवाल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे सोपवणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2015 09:54 AM IST

ताज्या बातम्या