नवं वर्षाचं सेलिब्रेशन करा पण जपून !!

नवं वर्षाचं सेलिब्रेशन करा पण जपून !!

  • Share this:

31st party231 डिसेंबर : नवीन वर्ष 2016 च्या स्वागतासाठी सगळेच जण तयारीत आहेत. प्रत्येक ठिकाणी या नवीन वर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन जोरदार रंगणार आहे. कुणी पबमध्ये जाऊन गाण्यावर ठेका धरत नवीन वर्षाचं स्वागत करेल. तर कुठे एकच प्याला रिचवत, तर कुणी गेल्या वर्षात काय घडलं आणि नवीन वर्षात काय करावं, काय अपेक्षा आहेत याचा विचार करत स्वागत करेल.

आनंदाच्या धुंदीत 10 ते 1 काऊंनडाऊन होऊन आपण ऐकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ...पण स्वागतातल्या उत्सवावर पोलिसांचीही करडी नजर असणार आहे हे ही लक्षात घ्यावं.

नाचा, बागडा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या पण नियम पाळा असं सगळ्यांना आव्हान आहे. प्रायव्हेट बोट पार्टीला बंदी आहे, ड्रंक अँण्ड ड्राईव्ह, रात्री उशीरापर्यंत घराबाहेर न थांबणं हे सगळं लक्षात असू द्या...म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत व्यवस्थित केल्याचा आनंद वेगळाच असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2015 08:12 AM IST

ताज्या बातम्या