छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

  • Share this:

vadala_rape_case29 डिसेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातल्या करंजी इथल्या एका अल्पवयीन मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलीय.या प्रकरणी चाैघांना ताब्यात घेण्यात आलंय.

कोपरगाव मधल्या महिला महाविद्यालयात 11 वी मध्ये ताराबाई आहेर ही मुलगी शिकत होती. याच गावातल्या काही मुलांनी ताराबाईचे काही फोटो काढले आणि तिला ब्लॅकमेल करू लागले. या त्रासाला कंटाळून तिनं हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर त्रास देणार्‍या मुलांना जाबही विचारण्यात आला होता, त्यानंतर चार दिवस ही मुलगी बेपत्त होती. नंतर 22 तारखेला ताराचा मृतदेह गोदावरी एक्स्प्रेस कालव्यात आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र आढाव, नितीन गागवान, आकाश भिंगारे आणि राहुल जगताप या तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 29, 2015, 9:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading