'काँग्रेस दर्शन'मध्ये वादग्रस्त लेख : संपादक सुधीर जोशींची उचलबांगडी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2015 10:25 PM IST

'काँग्रेस दर्शन'मध्ये वादग्रस्त लेख : संपादक सुधीर जोशींची उचलबांगडी

congress darshan

28 डिसेंबर :  काँग्रेस पक्षाचा आज 131वा वर्धापन दिन. पण आजच्याच दिवशी काँग्रेस पक्षाला घरचा अहेर मिळाला. काँग्रेसच्या मुंबईतल्या मुखपत्रातून चक्क सोनिया गांधी, त्यांचे वडील आणि जवाहरलाल नेहरू या सगळ्यांवर टीका करण्यात आलीये. त्यानंतर मग नेहमीप्रमाणे संपादकावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आज (सोमवारी) सुधीर जोशी यांची वृत्तपत्राच्या कंटेट एडिटर पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सारवासारव केली खरी, पण त्यांच्यावरच कारवाई व्हावी, अशी मागणी नसीम खान यांनी केलीये. त्यामुळे मुंबई काँग्रेसमधली गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

काँग्रेस पक्षाचा 131 वा स्थापन दिवस साजरा होत असतानाच एक अनपेक्षित वाद उफाळला. मुंबई काँग्रेसच्या 'काँग्रेस दर्शन' या हिंदी मुखपत्रातून चक्क गांधी-नेहरू घराण्यावरच टीका करण्यात आली! नेहरूंनी काश्मीर प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळला, असं एका लेखात म्हटलंय. एवढंच नाही तर सोनिया गांधींचे वडील फॅसिस्ट सैनिक होते, असं लिहून काँग्रेस अध्यक्षांच्या माहेरच्या लोकांवर टीका करण्यात आली.

पंडीत नेहरूंनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे ऐकले असते, तर आज शेजारील देशांमुळे उदभवणारे प्रश्न निकाली निघाले असते, असं या वादग्रस्त लेखात लिहिण्यात आले आहे. पटेलांना उपपंतप्रधानपद आणि गृहमंत्रिपद मिळूनही त्यांचे आणि नेहरूंचे संबंध नेहमी ताणलेले होते. दोघांनी अनेक वेळा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. जर नेहरूंनी पटेलांची दूरदृष्टी स्वीकारली असती, तर काश्मीर, चीन, तिबेट आणि नेपाळबाबतच्या अनेक समस्या आज अस्तित्वात नसत्या, असंही यात म्हटलं आहे.

मुंबई काँग्रेसच्याच मुखपत्रामध्ये थेट माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्यात आल्यामुळे विरोधकांना तर हे ऐतं कोलीतच मिळालं आहे. त्यामुळे एकुणच राजकीय वर्तुळात मोठ्याप्रमाणावर खळबळ उडाली होती.

Loading...

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निरुपम यांनी दिलगिरी व्यक्त केली असली आणि कार्यकारी संपादक सुधीर जोशींवर कारवाई करण्यात आली असली, तरी अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. या घोडचुकीची जबाबदारी नेकमी कोण? हे करण्यामागे कुणाचा आणि काय हेतू होता? असे अनेक प्रश्न काँग्रेसच्याच नसीम खान यांनी उपस्थित केले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक एका वर्षावर आली असताना काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी पुन्हा या निमित्ताने बाहेर आली आहे. पण आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसला आता या अंतर्गत वादाच्या प्रदर्शनाची डोकेदुखी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2015 07:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...