S M L

प्रतीक्षा संपली...! रिलायन्स जियो 4 जी सेवा लाँच

Samruddha Bhambure | Updated On: Dec 28, 2015 10:11 AM IST

प्रतीक्षा संपली...! रिलायन्स जियो 4 जी सेवा लाँच

27 डिसेंबर : देशभर ज्या गोष्टीची प्रतिक्षा होती त्या रिलायन्सच्या 4 जी सेवेची आजपासून सुरवात झाली. नवी मुंबईतल्या रिलायन्स कॉरोर्पोरेट पार्कमध्ये एक शानदार सोहळा झाला. त्यात 'रिलायन्स जियो 4 जी'ची सेवा सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला रिलायन्स जियोचा ब्रँड ऍम्बेसेडर अभिनेता शाहरुख खान उपस्थित होता. तसंच या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमाननं काही गाणी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरवातीला रिलायन्सच्या कर्मचार्‍यांना मिळणार आहे. याच कनेक्शनमध्ये वाढ करुन ही संख्या 1 लाखापर्यंत नेण्यात येईल. 4 जी सेवेमुळे भारतात नव्या परिवर्तनाची सुरवात होईल असं रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. रिलायन्सचे संस्थापक स्वर्गीय धीरुभाई अंबानी यांच्या 83 व्या जयंतीचं औचित्य साधून रिलायन्सनं ही सेवा सुरू केली आहे.

50 पेक्षा अधिक शहरांमध्ये असणार रिलायन्सचे हॉट स्पॉट

रिलायन्स जियो मोठ्या प्रमाणावर आपली 4 जी सेवा सुरू करणार आहे. त्यासाठी देशभरातील 50 शहरांमध्ये ग्राहकांसाठी हॉट स्पॉट लावण्यात आले आहे. त्यामुळे 4 जी डाटा कनेक्टींगसाठी ग्राहकांना अडचण येणार नाही.

रिलायन्स जियो करणार भारताचं डिजिटालाईजेशन

Loading...

भारतात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी रिलायन्सने पूर्ण तयारी केली आहे. याच कारण म्हणजे, रिलायन्स जियोकडे पूर्ण देशात स्पेक्ट्रम आहे. संपूर्ण देशात तब्बल 2.5 लाख किलोमिटरपर्यंत फायबर ऑप्टिक्सचं जाळ आहे. त्यामुळे देशात तुम्ही कुठेही असला तरी नेटवर्क हे एकसारखच मिळेल.

4Gचे फायदे काय?

इंटरनेटचा स्पीड कित्येक पटीनं जास्त मिळतो

इंटरनेटचा स्पीड 100 एमबीपीएसपर्यंत जाऊ शकतो

यूट्यूबवर व्हिडिओ लगेच लोड होतो

डाऊनलोडिंगची प्रक्रियाही खूप लवकर पूर्ण होते

गाणी, चित्रपट आणि गेम्स खूप लवकर डाऊनलोड होतील

4G सेवा देणार्‌या कंपन्यांकडे तुलनेनं स्पेक्ट्रम जास्त असल्यामुळे हे शक्य होतं

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 27, 2015 09:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close