पत्नीच्या प्रसूतीसाठी 10 हजार नव्हते म्हणून शेतकर्‍याची आत्महत्या

पत्नीच्या प्रसूतीसाठी 10 हजार नव्हते म्हणून शेतकर्‍याची आत्महत्या

  • Share this:

sangali_farmer_susaid26 डिसेंबर : पत्नीच्या प्रसूतीचं बिल भरण्यासाठी 10 हजार रुपये नाही म्हणून या शेतकर्‍यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात घडलीये. श्रीशैल रायगोंडा बिजरगी असं या शेतकर्‍याचं नाव आहे.

रायगोंडा बिजरगी या शेतकर्‍याच्या बायकोने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र हे कळण्याआधीच या शेतकर्‍यानं हे चुकीचं पाऊल उचललंय. श्रीशैल रायगोंडा बिजरगी हा तरुण शेतकरी फक्त 30 वर्षांचा आहे. विजापूर रस्त्याजवळ विष पिऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. या शेतकर्‍यानं यापूर्वीही दोन वेळा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जत येथिल खाजगी रुग्णालयात त्याच्या पत्नीवर उपचार सुरू असून तिला प्रसूती नंतर मुलगा झाला आहे. श्रीशैल बिजरगी हा पैसे आणण्यासाठी जातो म्हणून दवाखान्यातून बाहेर पडला. विजापूर रस्त्याला कोरी यांच्या शेतात विष पिऊन त्याने आत्महत्या केली.याची जत पोलिसांत नोंद झाली आहे. मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

Tags:
First Published: Dec 26, 2015 03:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading