पंतप्रधान मोदी पाकला जाणार, शरीफ यांची 'बर्थ डे' भेट घेणार

  • Share this:

modi sharif meet25 डिसेंबर : अफगाणिस्तान दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे सर्वांना धक्का देत पाकिस्तानला भेट देण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तान दौर्‍यावरुन परतताना मोदी लाहोरमध्ये थांबणार असून पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेणार आहे. नवाज शरीफ यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मोदी शरीफ यांची भेट घेऊन शुभेच्छा देणार असल्याचं कळतंय.

पंतप्रधान मोदींनी याबद्दल ट्विटवरुन माहिती दिली. आज सकाळीच मोदींनी शरीफ यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. काल गुरुवारीच पाकने भारताला सचिव स्तरावर चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं. त्यातच आज पंतप्रधानांनी लाहोरला थांबण्याचा निर्णय घेत आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे भारत आणि पाकमध्ये चर्चेसाठी निर्णय झालाय. याच महिन्यात दोन्ही देशातील सुरक्षा सल्लाकारांनी बँकाकमध्ये भेट घेतली होती. यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानाचा दौरा केला होता. पाकिस्तानमधील सरकारी सूत्रांच्या मते भारतातर्फे पाकला पंतप्रधान मोदींच्या थांबण्याच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आलीये. खुद्द नवाझ शरीफ लाहोर विमानतळावर मोदींचं स्वागत करण्याची शक्यता आहे. या अचानक भेटीवर काँग्रेसने टीका केलीये. पंतप्रधानांनी अशी अचानक भेट घेणे हा भारतासाठी अपमानाजनक आहे अशी टीका मनीष तिवारी यांनी केली. तर पाकिस्तान सुधारला आहे जे मोदी तिथे स्वत : जात आहे. अमेरिका आणि रशियाचे नेते असे अचानक शत्रू राष्ट्रात जातात का ? असा सवाल रश्दी अल्वी यांनी उपस्थित केला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First Published: Dec 25, 2015 02:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading