मालवणीतील बेपत्ता झालेला तिसरा तरुणही घरी परतला

  • Share this:

malad malvani isis25 डिसेंबर : मालवणीतला बेपत्ता झालेला तिसरा तरूणही परतला आहे. काही दिवसांपूर्वी मालवणीमधील तीन तरूण अचानक बेपत्ता झाले होते. हे तिन्ही तरुण इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असून हे तिघही इसिसच्या भरतीमध्ये सामिल होण्यासाठी संपर्कात असल्याची संशय होता. मात्र हे तिन्ही तरूण मालवणीतील आपल्या घरी परतले आहेत.

यातला एक तरूण वाजीद शेखला पुणे एटीएसने ताब्यात घेतलं होतं. यानंतर इतर दोनही तरुण आता स्वगृही परतले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. वाजीदची चौकशी केली असता तो इसिसच्या संपर्कात नव्हता अशी माहिती समोर आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 25, 2015, 9:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading