Elec-widget

मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा

  • Share this:

CM in UArangabad

24 डिसेंबर : मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. सोलापुरातल्या आसार चौकात हा प्रकार घडला. मातंग समाजावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ समाजातल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही सोहम लोंढेंच्या नेतृत्वात मातंग समाज विकास परिषदेनं हे आंदोलन केलं. यावेळी सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्री सोलापुरात गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

यावेळी कार्यकर्त्यांनी काळा शर्ट घालुन आणि निषेधाचे फलक लावून व्यक्त केली नाराजी व्यक्त केली तसंच 'मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो...'च्या घोषणाही दिल्या. तर ताफा अडवणार्‍या 25 आंदोलकांना घेतलं पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2015 08:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...