S M L

शाहरुखच्या व्हॅनिटीविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार

Samruddha Bhambure | Updated On: Dec 23, 2015 11:24 AM IST

शाहरुखच्या व्हॅनिटीविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार

23 डिसेंबर : अभिनेता शाहरुख खान आता त्याच्या अवाढव्य व्हॅनिटी व्हॅनमुळे पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर उभी असलेली व्हॅनिटी व्हॅन रस्त्यावर पार्क केल्याने शाहरुखच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. वॉचडॉग फाऊंडेशननं यावर आक्षेप घेतला असून, त्यांनी शाहरुख खानविरोधात वाहतूक नियंत्रण कक्षाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शाहरुखच्या वांद्रे इथल्या 'मन्नत'च्या बाहेरची गल्ली खूप छोटी आहे. त्यात रस्त्याच्या कडेला ही व्हॅन उभी आहे. मात्र यामुळे वाहतुकीला अडथळ होत असून, खाजगी वाहन सार्वजनिक रस्त्यावर का, असा सवाल विचारत 'वॉचडॉग फौंडेशन'ने ही तक्रार केली आहे. त्यामुळे आता मुंबई वाहतूक पोलीस कारवाईचा बडगा उचलण्याची शक्यता आहे.


या फाऊंडेशनचे एक सदस्य काल या गल्लीतून जात होते. व्हॅन तिथे पाहून ते तिथे थांबले तर शाहरुखच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकलं. व्हॅनच्या जास्त जवळ जाऊ नका, असंही ते म्हणाले. त्यानंतर या संस्थेनं पोलिसांकडे तक्रार केली.

याच व्हॅनिटी व्हॅनसाठी शाहरुखने अनधिकृत रॅम्प बांधला होता. त्याच्यावर मुंबई महापालिकेने 14 फेब्रुवारी 2015 रोजी हातोडा चालवला होता. इतकंच नाही तर शाहरुखकडून 1 लाख 93 हजारांची नुकसान भरपाईही वसूल करण्यात केली होती.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2015 10:11 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close