राज्यात कडाक्याची थंडी, मुंबईसह उत्तर महाराष्ट्राचं तापमान घसरलं

राज्यात कडाक्याची थंडी, मुंबईसह उत्तर महाराष्ट्राचं तापमान घसरलं

  • Share this:

1636672

23 डिसेंबर : एरवी घामाच्या धारांनी वैतागणारे मुंबईकर सध्या तापमान घसरल्याने चांगलेच गारठले आहेत. मुंबईत इतिहासातील आतापर्यंतच्या दुसर्‍या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईचा पारा आज (बुधवारी) तब्बल 11.6 अंशांवर घसरला. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार बुधवारी सांताक्रूझ इथे 11. 6 अंशांपर्यंत तापमान उतरलं आहे, तर कुलाबामध्ये 17.8 अंश तापामानाची नोंद झाली आहे. मुंबईसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात गुलाबी थंडीचे वातावरण आहे.

राज्यात नाशिक आणि निफाडमध्ये राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये पारा 6 अंशांवर तर निफाडमध्ये पारा 7 अंशांवर घसरला आहे.

नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबदमध्येही पारा घसरला असून थंडीचा गारठा वाढला आहे.औरंगाबादमध्ये 13 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. पुण्यातही बोचरी थंडी जाणवत आहे. पुण्यात 10 अंशांपर्यंत तापमान खाली उतरलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात फारसा फरक पडणार नाही असंही हवामान खात्यानं जाहीर केलं.

दरम्यान, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र गारठला असला तरी थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये मात्र पारा अद्याप खाली गेलेला नाही. गुलाबी थंडीची मजा लुटण्यासाठी महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओढा असतो, पण राज्यात सर्वत्र थंडीचे वातावरण असताना महाबळेश्वरमधील तापमान त्यामानाने खाली उतरले नसल्याने पर्यटकांची निराशा झाली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलं गेलेलं तापमान

मुंबई (कुलाबा) 20.4

मुंबई (सांताक्रुझ) 13.4

रत्नागिरी 18.0

पणजी (गोवा) 22.2

पुणे 12.6

अहमदनगर 10.6

जळगाव 11.0

कोल्हापूर 19.1

महाबळेश्वर 13.1

मालेगाव 14.4

नाशिक 6.0

सांगली 18.0

सातारा 15.1

सोलापूर 19.0

उस्मानाबाद 15.5

औरंगाबाद 13.0

परभणी 17.1

अकोला 14.0

अमरावती 15.2

बुलडाणा 19.6

गोंदिया 15.9

नागपूर 15.5

वाशिम 20.6

वर्धा 17.0

यवतमाळ 16.4

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First Published: Dec 23, 2015 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading