डेन्मार्कची फुटबॉलपटू झाली मनमाडची सून

डेन्मार्कची फुटबॉलपटू झाली मनमाडची सून

  • Share this:

manmad321 डिसेंबर : म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात आणि खर्‍या प्रेमाला जाती-पाती, भाषा,धर्म, अगदी देशाच्याही सीमा नसतात. असंच काहीतरी आज मनमाडमध्ये झालं. हॉलीवूड चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध असलेले पिले पेडरसन यांची मुलगी आणि डेन्मार्कची आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सिसिलिया हिचा विवाह मनमाडच्या राहुल एलींजे सोबत थाटामाटात झाला असून भारतीय संस्कृती नुसार बौध्द पद्धतीने विवाह लावण्यात आल्यानंतर डेन्मार्कची सिसिलिया ही आज मनमाड ची सून झाली. आगळ्यावेगळ्या या लग्न सोहळ्यास सिसिलीयाचे आई-वडील आणि तिची मैत्रीण देखील उपस्थित होते.

सकाळी राहुल बोहोल्यावर चढल्या नंतर त्याच्या घरापासून वाजत गाजत वरात काढण्यात आली. त्यात डीजेच्या तालावर सिसिलीयाची आई-वडील आणि मैत्रिणीने भारतीय गाण्यावर ठेका धरून जोरदार डान्स केला. मंगल कार्यालयात वर- वधू आल्यानंतर थायलंडचे भन्ते यांनी सिसिलिया व राहुल चा बौद्ध पद्धतीने लग्न लावले. डेन्मार्कची मुलगी मनमाडची सून होणार असल्याचे ऐकून उत्सुकतेपोटी

शहरातील नागरिकांनी लग्न सोहळ्यास मोठी गर्दी केली होती. आमच्या मुलीने भारतीय मुलाशी लग्न केल्याबद्दल आम्ही समाधानी आणि आनंदी असल्याचं सिसिलीयाच्या आई-वडिलांनी सांगितलं. आमच्या मनाप्रमाणे लग्न झाल्यामुळे आम्ही खूप आनंदात असल्याचे नववधू- सिसिलिया आणि नवरदेव राहुलने सांगितलं.

राहुल याने प्रतिकूल प्रस्थितीवर मात करून त्याने उच्च शिक्षण घेतल्या नंतर डेन्मार्कला गेला तेथे त्याला एका मोठ्या महाविद्यालयात प्राद्यापकाची नोकरी मिळाली. राहुल डेन्मार्कमध्ये योगा शिकविन्याचे देखील काम करत असताना सिसिलियासोबत त्याची ओळख होऊन त्याचे प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भारतात येऊन आज लग्न केलं. सिसिलिया ही आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू असल्यामुळे हे लग्न चर्चेचा विषय ठरले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 21, 2015, 11:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading