News18 Lokmat

अरुण जेटली केजरीवालांविरोधात ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2015 08:35 AM IST

अरुण जेटली केजरीवालांविरोधात ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

21 डिसेंबर : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि आपच्या काही इतर नेत्यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत.

दिल्ली क्रिकेट असोसिएनचे अध्यक्ष असताना असोसिएशनमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाले, असा आरोप केजरीवाल यांनी केला होता. दिल्ली हायकोर्टात दिवाणी खटला तर पटियाला हाऊस कोर्टात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे. जेटलीजी, तुम्हाला आम्हाला कोर्टात खेचलंत तर आम्ही तुम्हाला जनतेच्या कोर्टात खेचू, असं प्रत्युत्तर आपचे नेते आशुतोष यांनी दिलं आहे.

दरम्यान, पूर्व क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार यांनी रविवारी दिल्ली क्रिकेट असोसिएनशनवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले होते. एका पत्रकार परिषदेत आझाद यांनी बनवलेला व्हिडिओही दाखवण्यात आला. डीडीसीएमध्ये अनेक गैरव्यवहार झाले आहेत. ज्या कंपन्यांना कंत्राटांसाठी पैसे देण्यात आले, त्यांचे पत्ते खोटे आहेत, आणि काही कंपन्याच बोगस आहेत, त्या अस्तित्वातच नाहीत, असा आरोप आझाद यांनी केला. मी मोदींचा फॅन आहे. माझं अरुण जेटलींशी कोणतही वैर नाही. मला फक्त भ्रष्टाचाराचं निर्मूलन करायचंय, असंही आझाद म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2015 08:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...