महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांना क्लिन चीट नाही - किरीट सोमय्या

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांना क्लिन चीट नाही - किरीट सोमय्या

  • Share this:

somaiya and bhujbal

20 डिसेंबर : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांना कुठलीही क्लीन चिट मिळालेली नाही, असा दावा भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय कडक पावलं उचलणार असल्याची माहिती, सोमय्या यांनी दिली आहे.

भाजपचे खासदार किरीट सौमय्यांनी आज (रविवारी) पत्रकार परिषद घेऊन, समृद्ध जीवन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा आणि सिंचन घोटाळा या विषयांबाबत म्हत्वाची माहिती दिली आहे. तसंच यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला.

भुजबळ यांच्याशी संबंधित 182 कंपन्यांची चौकशी सुरू असून त्यापैकी 77 कंपन्यांना नोटिसा बजावल्याची माहिती सौमय्यांनी दिली आहे. त्याबरोबर, छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्या विरोधात ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने कडक चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे भुजबळांना क्लीन चीट देण्याचा प्रश्नच नाही, असंही ते म्हणाले.

तसंच सिंचन घोटाळ्याबाबतही त्यांनी माहिती दिली. एफ . ए. न्स्ट्रक्शनचे पैसे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या खात्यात वळवले गेल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यांनी घोटाळे केले ते जेलमध्ये जाणारच, असं त्यांनी सांगितलं.

Loading...

दरम्यान, केंद्रीय सहकार मंत्रालयाने समृद्ध जीवनबाबत केलेली विशेष तपास प्रक्रीया पूर्ण केली असल्याची माहिती त्यांनी दिली. मोतेवार काही दिवसांचे पाहुणे असून, सेबीने बंदी घातलेली असतानाही महेश मोतेवारांनी 525 कोटींची अफरातफर केल्याचा आरोप सौमय्यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2015 02:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...