सेनेचे मंत्री कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात, दुष्काळी भागाची करणार पाहणी

सेनेचे मंत्री कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात, दुष्काळी भागाची करणार पाहणी

  • Share this:

sena dora419 डिसेंबर : मराठवड्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री आजपासून दोन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळ दौर्‍यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेड, कुर्‍हा, काकोडा, वडोदा या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी शिवसेनेचे राज्यमंत्री दीपक केसरकर, उपनेत्या नीलम गोर्‍हे, जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या या दौर्‍यात सहभागी होणार आहेत.

तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकर्‍यांना,आणि आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाना शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनीं भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतात की नाही यांची माहिती शिंदेंनी घेतली. इगतपुरी गावातील काळुस्ते गावातील आदिवासी शेतकर्‍यांची जमीन 10 वर्षा पूर्वी भाम धरणासाठी संपादित केली असून,उर्वरित जमिनी संपादित करू नये अशी विंनती गावकर्‍यांनी शिंदे यांच्याकडे केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2015 05:59 PM IST

ताज्या बातम्या