भाजपकडून सुडाचं राजकारण, मुंबईत काँग्रेसची निदर्शनं

भाजपकडून सुडाचं राजकारण, मुंबईत काँग्रेसची निदर्शनं

  • Share this:

rane319 डिसेंबर : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज मुंबईत वांद्रे खेरवाडी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. काँग्रेस नेते नारायण राणेंच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जाणूनबुजून या प्रकरणात अडकवलं जातंय. भाजप सुडाचे राजकारण करत आहे अशी टीका यावेळी राणेंनी केली.

काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरूपम तसंच माजी खासदार आणि आमदारही आंदोलनात सहभागी झालेत. मुंबई काँग्रेसचे पदाधीकारी आणि महिला कार्यकर्त्यांही या निदर्शन आंदोलनात सहभागी झालेत.

दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी वांद्रे खेरवाडी इथं रस्त्यावर टायर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला पण पोलिसांनी आंदोलकांकडून टायर ताब्यात घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदींच्या पोस्टरलाही काळ फासलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2015 01:37 PM IST

ताज्या बातम्या