शनिच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, महिला आमदारांची मागणी

शनिच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, महिला आमदारांची मागणी

  • Share this:

Varsha Gaiwkawad

18 डिसेंबर :  शनिशिंगणापुरमध्ये चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी महिला आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आज आंदोलन केलं. काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड आणि इतर महिला आमदारांनी पायर्‍यांवर पायर्‍यांवर आंदोलन केले. तसंच या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचं आंदोलक आमदारांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी चौथर्‍यावर प्रवेश करत एका तरुणीने शनिला अभिषेक घातला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर महिलांना चौथर्‍यावर प्रवेश मिळावा अशी मागणी जोर धरु लागली होती. त्याचेच पडसाद आज विधानभवनाबाहेर पडले आहेत.

दुसरीकडे, नंदा दरंदले, नूतन शेटें यांच्यासह दोन महिलांनी शनीशिंगणापूरच्या विश्वस्त मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगर धर्मादाय सहाय्यक आयुक्तालयात हे अर्ज सादर करण्यात आले आहेत. विश्वस्तपदासाठी आतापर्यंत 76 अर्ज दखल करण्यात आले असून त्यात 73 अर्ज पुरुषांचे तर 4 महिलांनीही यापदासाठी अर्ज दाखल केले आहेत. विश्वस्तपदासाठी 11 जागा आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेचा शनिवार हा शेवटचा दिवस आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2015 06:56 PM IST

ताज्या बातम्या