वर्‍हाडाच्या सामानावर चोराचा डल्ला, 9 लाखांचा ऐवज लंपास

वर्‍हाडाच्या सामानावर चोराचा डल्ला, 9 लाखांचा ऐवज लंपास

  • Share this:

ulhasnagar chori18 डिसेंबर : उल्हासनगरमधील जवाहर हॉटेलमध्ये उतरलेल्या लग्नाच्या वर्‍हाडाच्या सामानावर चोरट्यांनी डल्ला मारलाय. जवळपास 9 लाखांचा ऐवज या चोरट्यांनी लंपास केलाय. हा सर्व प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झालाय.

उल्हासनगर मधील व्यावसायिक दीपक मित्तल यांच्या मुलीचा विवाह 14 डिसेंबर रोजी जवाहर हॉटेलमध्ये आयोजित केला होता. त्यामुळे दोन दिवस आधीच लग्नाचे वर्‍हाडी हॉटेलमध्ये उतरले होते. लग्नाचे वर्‍हाड म्हणजे दाग दागिने असणारच ते चोरी करण्याच्या उद्देशाने एक चोरटा हॉटेलमध्ये शिरला. त्यानंतर त्या चोरट्याने हॉटेलच्या तिसर्‍या मजल्यावर जाऊन कोणती रूम उघडी आहे का याची तपासणी केली.

सकाळी वेळ असल्याने बहुतेक जण चहा पिण्यासाठी खाली उतरले होते तर महिला झोपेत होत्या, त्यातील 316 क्रमांकाच्या रूममधील गोयल यांची रूम उघडी असल्याचा फायदा घेत तो रूममध्ये शिरला आणि पुनम गोयल यांची दागिन्याने भरलेली पर्स घेऊन हॉटेल मधून आरामात निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

पूनम यांच्या पर्समध्ये साडेआठ लाखांचे दागिने आणि 50 हजारांची रोकड होती ती चोराने लंपास केली. या प्रकरणी गोयल यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोराचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 18, 2015, 12:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading