एसटी डेपोतच, संप दुसर्‍या दिवशीही सुरूच

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2015 02:12 PM IST

एसटी डेपोतच, संप दुसर्‍या दिवशीही सुरूच

st strike18 डिसेंबर : पगारवाढीसाठी एसटी कामगारांच्या इंटक संघटनेनं पुकारलेला राज्यव्यापी संप आज दुसर्‍या दिवशीही सुरूच आहे.

मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच ठेवणार असा निर्धार संघटनेनं केलाय. या संपामुळे ग्रामीण भागात आजही प्रवाशांचे हाल होत आहे.  मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेण्यास इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी नकार दिलाय.

दरम्यान, याच संपावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी वाजता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आंदोलक एसटी कर्मचार्‍यांची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो यावरच संपाबाबतची भूमिका स्पष्ट होईल.

काल गुरुवारी राज्यभरातून इंटकच्या या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील एसटी गाड्यांच्या अनेक फेर्‍या ऐनवेळी रद्द कराव्या लागल्या. नागपूर बस डेपोमध्ये अशाच बसेस उभ्या आहेत. त्यात आंदोलकांनी या बसेसच्या चाकाची हवाच काढली. तर औरंगाबादमध्येही जवळपास 40 बसच्या हवा चालक आणि वाहकांनी सोडून आंदोलनाला वेगळ वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यातील बससेवा ठप्प झाल्याच चित्र आहे. औरंगाबादमध्ये या बंदचा मोठा परिणाम झाला असून बस बंदमुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2015 11:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...