S M L

'बाजीराव मस्तानी-दिलवाले'मध्ये सिंगल स्क्रिनचा वाद कोर्टात

Sachin Salve | Updated On: Dec 18, 2015 10:07 AM IST

'बाजीराव मस्तानी-दिलवाले'मध्ये सिंगल स्क्रिनचा वाद कोर्टात

18 डिसेंबर : 'बाजीराव मस्तानी' आणि 'दिलवाले' दोन मोठे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्यामुळे स्क्रिन्सचा वाद होणार हे साहजिकच होतं...नेमकं तेच घडलं...सिंगल स्क्रिनही दिलवालेनं मिळवल्यामुळे इरॉसने कोर्टाने धाव घेतलीये.

'बाजीराव मस्तानी'ची निर्माते आहेत इरॉस तर 'दिलवाले'चे निर्माते आहेत रेड चिलीज अर्थात शाहरुख खानची स्वत:ची कंपनी. वर्षाच्या सुरुवातीपासूनच सर्वांचं लक्ष वेधलं होतं ते 18 डिसेंबरकडे...शेवटी व्हायचं तेच झालं...सिंगल स्क्रिनचा वाद चिघळला. 'बजरंगी भाईजान' प्रदर्शित व्हायच्या आधीच इरॉसने सिंगल स्क्रिनच्या मालकांसोबत बाजीराव मस्तानीचे शोज मिळण्याची व्यवस्था केली होती. पण ऐनवेळी सिंगल स्क्रिनच्या मालकांनी शाहरुखच्या 'दिलवाले'ला कौल दिला आणि इरॉसने हा वाद कोर्टात नेला.

ऍडव्हान्स बुकिंग आणि ऑनलाईन बुकिंगमध्येही दिलवालेनं बाजी मारली कारण बाजीराव मस्तानीच्या पारड्यात कमी स्क्रिन्स मिळाल्या. मल्टिप्लेक्सवरही दिलवालेचं वर्चस्व आहे तर सिंगल स्क्रिनसाठी बाजीराव मस्तानीचे निर्माते झगडत आहेत. अखेर शुक्रवारी बाजीराव मस्तानीला न्याय मिळणार की दिलवाले बाजी मारणार? कोण जिंकणार प्रेक्षकांची मनं? कोण ठरणार बॉक्स ऑफीसचा किंग? की आणखी एक नवी कॉण्ट्रोवर्सी होणार? हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2015 08:54 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close