पुणे -राजकोटसाठी खेळाडूंचा लिलाव; चेन्नई,राजस्थानच्या खेळाडूंना जीवदान

पुणे -राजकोटसाठी खेळाडूंचा लिलाव; चेन्नई,राजस्थानच्या खेळाडूंना जीवदान

  • Share this:

pune rajkot15 डिसेंबर : आयपीएलच्या पुणे आणि राजकोट या दोन नव्या संघांसाठी आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सुरेश रैना या नावाजलेल्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. चेन्नई आणि राजस्थान या संघांतील खेळाडूंबरोबर इतर काही खेळाडूंचाही या वेळी लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे या नव्या संघांमुळे खेळाडूंना पुन्हा एकदा मैदान मोकळे होणार आहे.

आयपीएलमध्ये स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि राजकोट या नवीन संघांची दोन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. कोलकाताचे उद्योजक संजीव गोएंका यांनी पुण्याची फ्रँचायझी विकत घेतली आहे, तर इन्टेक्स मोबाइल कंपनीने राजकोटची फ्रँचायझी विकत घेतली आहे. चेन्नई आणि राजस्थान या संघांतील खेळाडूंबरोबर अन्य काही खेळाडूंचाही या वेळी लिलाव करण्यात येणार आहे. तसंच यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ, निवृत्त शेन वॉटसन, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्क्युलम, वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो यांच्यासह एकूण 50 खेळाडंचा या लिलावात समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2015 11:43 AM IST

ताज्या बातम्या